Mulund Hit-And-Run Case: मुलुंड हिट-अँड-रननंतर ऑडी चालक विजय गोरेला अटक; कांजूरमार्गमध्ये सापडला आरोपी

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रथम अपघातस्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहण्यास सुरुवात केली.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Mulund Hit-And-Run Case: सोमवारी सकाळी मुलुंड (Mulund) येथे ऑडी (Audi) च्या धडकेत झालेल्या अपघातात रिक्षा चालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. विजय दत्तात्री गोरे असे कार चालकाचे नाव असून तो आपली कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला होता. अपघातानंतर काही तासांनी 43 वर्षीय विजय गोरे (Vijay Gore) या तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रथम अपघातस्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहण्यास सुरुवात केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला घटनास्थळावरील ऑडी गारमध्ये मोबाईल फोन सापडला. आम्ही त्याच्या फोनवर ड्रायव्हरबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच वाहनाच्या नोंदणीचे तपशील देखील तपासले. आम्हाला यात चाहकाचा पत्ता सापडला. जिथे एक टीम पाठवण्यात आली. मालाडमध्ये गोरे यांचे अपार्टमेंट सापडले, जे त्यांनी नुकतेच कोणालातरी विकले होते. सध्याच्या रहिवाशांनी पोलिसांना कळवले की, तो कांजूरमार्गच्या रुणवाल फॉरेस्टमधील एका अपार्टमेंटमध्ये राहतो. पोलिस याठिकाणी गेले असता त्यांना येथे अपार्टमेंटला कुलूप असल्याचे दिसले. मात्र, येथे कार चालकाची चौकशी केली असता तो कांजूरमार्ग येथे बहिणीकडे लपून बसल्याचे पोलिसांना आढळले. (हेही वाचा - Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा हिट अँड रन, पिंपरी गावात भरधाव कारने महिलेला उडवले, पहा व्हिडिओ)

तत्पूर्वी, कारची तपासणी करताना, पोलिसांना काही हॉटेलच्या पावत्याही सापडल्या होत्या, ज्यात गोरे यांनी मद्य प्राशन केल्याचे आढळले. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास गोरे त्यांच्या घरातून बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. भांडुपमधील बार आणि रेस्टॉरंट हा त्याचा पहिला थांबा होता, जिथे त्याने काही पेये घेतली. मग तो ठाण्याला एका वेगळ्या पबमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला. त्याच्या सोबत एक महिला होती. त्यानंतर दोघे कर्जतला लाँग ड्राईव्हसाठी गेले, तिथे त्यांनी रात्र काढली. (हेही वाचा - Pune Viral Video: मुलांच्या जीवाशी खेळ, स्कूल व्हॅनने तोडला ट्रॅफिक सिग्नल, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले)

दुसऱ्या दिवशी, गोरे प्रथम मुलुंड पूर्वेला गेला, बहुधा त्याच्या मित्राला सोडण्यासाठी आणि नंतर मुलुंड पश्चिमेला गेला जिथे अपघात झाला, असं पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी गोरेला अटक केली असून त्याची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या रक्ताचे नमुने विश्लेषणासाठी फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत. सध्या गोरे पोलिस कोठडीत असून त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. गोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत दारू पिऊन गाडी चालवणे, रॅश ड्रायव्हिंग या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif