Hit and Run in Pune: पुण्यात पुन्हा एकदा हीट अँड रन (Hit and Run) ची घटना घडली आहे. पिंपरी गावात (Pimpri Village) एका भरधाव कारने रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. ही महिला रस्त्याच्या बाजूने जात होती. यावेळी समोरून एक कार आली. या कारने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या महिलेला उडवले.
पहा व्हिडिओ -
पुण्यात पुन्हा हिट अँड रन, पिंपरी गावात भरधाव कारने महिलेला उडवले, थरारक घटनेचा VIDEO pic.twitter.com/fPvsftI6ht
— Maharashtra Times (@mataonline) July 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)