Anil Deshmukh यांच्या CBI चौकशीचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर कडून राजीनान्याची मागणी

देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.' असं ट्वीट करत भातखळकरांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

Atul Bhatkhalkar (Photo Credit: Twitter)

मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांवरील (Anil Deshmukh) कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सीबीआयला प्राथमिक चौकशी करून दोषी असल्याचं दिसल्यास FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पण यावरून आता राजकारण देखील सुरू झालं आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.' असं ट्वीट करत भातखळकरांनी हल्लाबोल केला आहे. नक्की वाचा:  HM Anil Deshmukh यांची 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणी CBI चौकशी करण्याचे Bombay High Court चे आदेश; Dr Jaishri Patil यांची Writ Petition मान्य.

सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपाने त्याचे स्वागत केले आहे. आता स्वतः उच्च न्यायालयानेच राज्याच्या गृहमंत्र्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे किमान आता तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत, सीबीआय चौकशीतून या खंडणी रॅकेट मधील खरे गॉडफादर समोर येतील अशी अपेक्षा भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.

राज्याचे गृहमंत्रीच महिन्याला 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे आदेश देतात, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये करोडो रुपये घेतात, असे आरोप राज्याच्या इतिहासात कधीच झाले नव्हते. या प्रकरणी मी स्वतः समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार करून, न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होऊन सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख आपली खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्यातील पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देतात तरी सुद्धा मुख्यमंत्री सत्ता वाचविण्याच्या नादात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत, यातून महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेची तमा न बाळगता त्यांच्यात शिल्लक असलेला ठाकरीबाणा दाखवत गृहमंत्र्यांची मंत्रिमंडळातुन तात्काळ हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.