Vasai: तरुणीवर चाकू हल्ला केल्यानंतर एका तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न; वसई येथील घटना
वसई (Vasai) येथे तरूणीसह तिच्या कुटुंबियावर चाकू हल्ला केल्यानंतर एका तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना वसई येथील एव्हरशाईन (Evershine) परिसरात सोमवारी घडली आहे. या हल्लात तरूणीसह तिची आईदेखील जखमी झाली आहे.
वसई (Vasai) येथे तरूणीसह तिच्या कुटुंबियावर चाकू हल्ला केल्यानंतर एका तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना वसई येथील एव्हरशाईन (Evershine) परिसरात सोमवारी घडली आहे. या हल्लात तरूणीसह तिची आईदेखील जखमी झाली आहे. या हल्ल्यानंतर तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केले आहे. ज्यामुळे त्याच्यावरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात (Waliv Police Station) गुन्हा दाखल करण्यात असून याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
आरोपी आणि पीडित तरूणी ऐकमेकांना ओळखतात. परंतु, पीडिताने काहीदिवसांपूर्वी आरोपीसोबत मैत्रीचे संबंध तोडले होते. या गोष्टीचा आरोपीच्या मनात राग होता. दरम्यान, पीडित आपल्या घरी जात असताना आरोपी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात तरूणी गंभीर जखमी झाली आहे. त्याचबरोबर यावेळी मध्ये आलेल्या तरुणीच्या आईवरही चाकूने वार केले. सध्या तरुणी आणि तिच्या आईवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्यानंतर आरोपीने स्वत:ही विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावरही जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे देखील वाचा- Pune Shivaji Market Fire: पुणे कॅम्प भागातील शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग; मटण आणि चिकनची 25 दुकाने जळून खाक, 40 लाखांचं नुकसान
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही नवी मुंबई येथे अशाचप्रकारची एक घटना उघडकीस आली होती. लग्नास नकार दिला म्हणून एका तरूणाने मुलीसह तिच्या आईलाही ठार केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी आरोपीनेही गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती.
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2021 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

