Attack On TC at Ambivli Railway Station: आंबिवली रेल्वे स्थानकात टीसी वर प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

आंबिवली रेल्वे स्थानकात (Ambivali Railway Station) एका टीसीने बिन तिकीट प्रवास करणार्‍याला हटकलं असता त्याच्यावर प्रवाशाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे.

Ambivali Railway Station| PC: wikipedia

मुंबई लोकलने (Mumbai Local) रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. पण त्यामध्ये काही बिनतिकीट प्रवास करणारे देखील असतात. अशाच विन तिकीट प्रवास करणार्‍यंवर चाप लावण्यासाठी टीसी (TC) नेमलेले असतात. पण आंबिवली रेल्वे स्थानकात (Ambivali Railway Station) एका टीसीने बिन तिकीट प्रवास करणार्‍याला हटकलं असता त्याच्यावर प्रवाशाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, जखमी टीसीचं नाव सुनिल गुप्ता आहे. आंबिवली स्टेशन वर सकाळी 9 च्या सुमारास सुनिक गुप्ता यांनी आपलं काम करत असताना एका बिनतिकीट प्रवास करणार्‍याला हटकलं. तेव्हा त्याने खिशातला ब्लेड काढून मानेवर वार करण्यास सुरूवात केली. नक्की वाचा: डोंबिवली: कोपर रेल्वे स्थानकात TC ला मारहाण करणारा प्रवासी अटकेत .

जखमी अवस्थेत असलेल्या सुनिक गुप्ता यांना तातडीने रेल्वेच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. दरम्यान ही घटना स्टेशन वरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून गुन्हेगाराचा आणि या प्रकाराचा तपास सुरू आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी या हल्ल्याचा निषेध करत अशा घटनांवर अधिक लक्ष देण्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.