पुणे: मिलिंद एकबोटे यांना सासवड येथे मारहाण; पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यावर गुन्हा दाखल

एकबोटे यांनी लिहिलेल्या पोस्टमुळेच संतप्त झालेल्या पंडित मोडक, विवेक मोडक आणि त्यांच्या समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला करावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंडित मोडक, विवेक मोडक आणि त्यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. पोलीस दप्तरी गुन्हा नोंद झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुणे: मिलिंद एकबोटे यांना सासवड येथे मारहाण; पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यावर गुन्हा दाखल
Milind Ekbote | | (Photo Credit: Archived, Edited Images, Facebook)

भीमा कोरेगाव हिंसाचार (Bhima Koregaon Violence) प्रकरणी चर्चेत आलेल्या मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांना सासवड येथील एका कार्यक्रमात मारहाण झाल्याचे वृत्त आहे. मिलिंद एकबोटे हे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष आहेत. सासवड (Saswad) येथील झेंडेवाडी या गावात हरिनाम सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यता आला होता. या कार्यक्रमासाठी एकबोटे आले होते. दरम्यान, मंगळवारी रात्री साडे नऊ वाजणेच्या सुमाराला ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, 40 ते 45 जणांच्या एका समूहाने मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद एकबोटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये “पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो”,अशा आशयाचा उल्लेख होता. (हेही वाचा, Bhima-Koregaon Violence : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 58 जणांना कोरेगाव-भिमा परिसरात बंदी)

दरम्यान, एकबोटे यांनी लिहिलेल्या पोस्टमुळेच संतप्त झालेल्या पंडित मोडक, विवेक मोडक आणि त्यांच्या समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला करावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंडित मोडक, विवेक मोडक आणि त्यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. पोलीस दप्तरी गुन्हा नोंद झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2019 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).