Shahaji Bapu Patil: माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला; दगडाने कारची काच फोडली
सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत.
Shahaji Bapu Patil: सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील (Shahaji Bapu Patil) यांचे पुतण्याच्या कारवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने सोलापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे हे सोलापूर जिल्हा युवा शिवसेनेचे संपर्क(Shiv Sena) प्रमुख आहेत. सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत.
सागर पाटील यांच्या कारवर हल्ला झाल्याची (Attack on Sagar Patil's car)घटना समोर आली आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांच्या ऑफीससमोर उभ्या केलेल्या कारवर हा हल्ला केला. अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे. शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास ही घटना घडली.(Madhukar Pichad Dies : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
अज्ञात व्यक्तीनी कारवर हल्ला केला तेव्हा सुदैवाने कारमध्ये कोणी नव्हते. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सागर यांच्या कारवर नेमका कोणी हल्ला केला? हल्ला करण्याचे कारण काय? याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांपर्यंत सध्या प्रकरण गेलेले नाही. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती सध्या तरी नाही.(Cabinet Expansion In Maharashtra: भाजप गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवणार? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कोणते खाते मिळणार? वाचा सविस्तर वृत्त)
शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयासमोर कार लावण्यात आली होती. अज्ञातांनी कारच्या मागील बाजूची काच दगडाने फोडली होती. कार फोडल्याच्या प्रकरणानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. सागर पाटील यांची कार कोणी कशामुळे फोडली.
याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञात व्यक्तीने दगड मारून घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञातांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे.