IPL Auction 2025 Live

Caste Wise Census: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले जातिनिहाय जनगणना करण्याचे समर्थन

त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आपला आळस झटकणे आवश्यक आहे. जनतेच्या कामे दिरंगाईन होत असतील तर त्यासाठी संबंधीत यंत्रणेलाच का जबाबदार धरु नये? असे मी मंत्रिमंडळाला सूचवणार असल्याचेही पटोले या वेळी म्हणाले.

Nana Patole | (Photo Credits: Facebook)

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जातिनिहाय जनगणना (Caste Wise Census) करण्याचे समर्थन केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, जर जनसंघर्ष टाळायचा असेल तर जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता. मी तो घेतला आणि विधानसभेाला त्यबाबत पटवूनही दिले. जातिनहाय जनगणा झाल्यास आरक्षणाच्या अनुषंगाने होणारा संघर्ष टळू शकेन, असेही नाना पटोले (Nana Patole support Caste Wise Census) या वेळी म्हणाले.

खासगी महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना पटोले यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षपद हे अतिशय जबाबदारीचे पद आहे. आपल्या कामातून विधानसभा अध्यक्षांचा नावा परीचय आपण करुन देणार आहोत. आपले अधिकार वापरुन लोकशाही अदिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पटोले यांनी या वेळी सांगितले. लोकसत्ता डॉट कॉमने याबबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची मागणी)

कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे माझा नियोजीत दौरा करता आला नाही. अन्यथा राज्यातील विविध भागात जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याचा माझा विचार होता. त्यासाठी राज्यभर जाण्यासाठी नियोजन तयार केले होते, असे पटोले यांनी या वेळी सांगितले. राज्याला मोठी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी राज्याच्या स्थापनेपासून विकासाच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थितीतही भरीव काम केले. राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. नव्या पीढिने हा इतिहास लक्षात ठेवायला हवा, असेही पटोले म्हणाले.

दरम्यान, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आळस झटकून कामाला लागले पाहिजे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आपला आळस झटकणे आवश्यक आहे. जनतेच्या कामे दिरंगाईन होत असतील तर त्यासाठी संबंधीत यंत्रणेलाच का जबाबदार धरु नये? असे मी मंत्रिमंडळाला सूचवणार असल्याचेही पटोले या वेळी म्हणाले.