Ashok Chavan on Nitin Raut: नितीन राऊत यांची वाढीव वीज बिलासंदर्भातील सवलतीच्या घोषणेत घाई, आमच्याकडून चुक झाली म्हणत अशोक चव्हाण यांनी केले मान्य

Ashok Chavan (Photo Credits-ANI)

Ashok Chavan on Nitin Raut:  कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना वीजेची वाढीव बिल आल्याने संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव बिलासंदर्भात सवलत दिली जाईल असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच नागरिकांना धक्का देत वाढीव वीज बिलाबद्दल दिलासा मिळणार नसल्याचे म्हटले. यावरुन आता विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वुभीवर कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा याबद्दल विधान केले आहे. चव्हाण यांनी असे म्हटले आहे की, नितीन राऊत यांनी वीज बिलासंदर्भात सवलत देण्याचा जो निर्णय घेतला त्यामध्ये घाई झाली. त्यामुळे आमची यामध्ये चुक असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

नितीन राऊत यांनी याआधी वाढीव वीजासंदर्भात असे ही म्हटले होते की, एकत्रित वीज भरणाऱ्या नागरिकांनी बिलावर 2 टक्के सवलत ही दिली जाणार आहे. परंतु अशोक चव्हाण यांनी असे म्हटले की, नितीन राऊत यांनी जाहीर केलेल्या निर्णयाबद्दल घाई केली. त्यामुळे निर्णय घोषित करण्यापूर्वी यावर चर्चा करणे आवश्यक होते.(ठाणे: वाढीव वीजबिलाविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार, अविनाश जाधव यांनी दिला इशारा)

दरम्यान, दुसऱ्या बाजूला मनसे कडून वाढीव विज  बिलासंदर्भात राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आल्याचे दिसून आले. तर लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना  वाढीव वीज बिले देण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात मनसेने सामान्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. राज्य सरकारने सामान्यांना वीज बिलामध्ये सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली. सध्या हा शांतपणे मोर्चा काढून सरकारला एक निवेदन दिले जाईल असे म्हटले गेले. परंतु त्याची सरकारने दखल घेतली नाही तर भविष्यात मनसे आक्रमक होईल असा इशारा सुद्धा दिला गेला आहे.