ASHA Workers Protest: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन; पगारवाढीसाठी GR लागू करण्याची केली प्रमुख मागणी
आम्ही 9 डिसेंबर, नंतर 9 जानेवारीपर्यंत वाट पाहिली आणि आता 9 फेब्रुवारी आहे, परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकारच्या अशा धोरणामुळे आशा कार्यकर्त्या खूप नाराज आहेत आणि त्यामुळे त्या निषेधासाठी येथे जमल्या आहेत, असंही डॉ. डी. एल कराड यांनी सांगितलं.
ASHA Workers On Indefinite Protest: दहा हजारहून अधिक आशा कर्मचाऱ्यांनी (Anganwadi Worker) 22 दिवसांचा संप संपवण्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये दिलेली पगारवाढ लागू करण्याचा सरकारी निर्णय (GR) जारी करावा, या मागणीसाठी शनिवारी दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य श्रमिक कर्मचारी युनियन संयुक्त कृती समितीचे मुख्य समन्वयक डॉ. डी. एल कराड यांनी सांगितले की, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन दिले होते की, आशा कामगार आणि ब्लॉक इन्व्हिजिलेटर्सनी मागितलेली पगारवाढ एक महिन्याच्या आत सरकार निश्चितपणे लागू करेल.
आम्ही 9 डिसेंबर, नंतर 9 जानेवारीपर्यंत वाट पाहिली आणि आता 9 फेब्रुवारी आहे, परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकारच्या अशा धोरणामुळे आशा कार्यकर्त्या खूप नाराज आहेत आणि त्यामुळे त्या निषेधासाठी येथे जमल्या आहेत, असंही डॉ. डी. एल कराड यांनी सांगितलं. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी सरकार उचलून धरणार असल्याचे आश्वासन दिल्याचंही यावेळी कराड यांनी नमूद केलं. (हेही वाचा -Anganwadi Workers Pension and Gratuity: अंगणवाडी सेविका पेन्शन आणि ग्रॅच्युटी बाबत मोठी बातमी, जाणून घ्या काय मिळणार लाभ?)
याशिवाय, आशा कार्यकर्त्यांची आणखी एक प्रमुख मागणी म्हणजे राज्य सरकारने आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या सर्वेक्षणासाठी स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावे. बहुतेक आशा कामगार दरमहा सुमारे 8,000 ते ₹9,000 रुपये कमावतात. त्यांच्यापैकी बहुतेकांकडे स्मार्टफोन नाहीत. आशा कार्यकर्त्या कोणत्याही ग्राउंड सर्व्हेमध्ये किंवा सरकारने तळागाळात सुरू केलेल्या कोणत्याही नवीन योजनांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यांना डिजिटल सर्वेक्षणांसाठी स्मार्टफोनसारख्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी मागणीही यावेळी कराड यांनी केली आहे.
तथापी, शुक्रवारी 16,000 आशा कार्यकर्त्या निषेधासाठी एकत्र आल्या. सोमवारी ही संख्या 20,000 पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचंही यावेळी कराड यांनी सांगितलं. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून आलेल्या मायाताई गुलप यांनी सांगितले की, आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिले होते, मात्र तीन महिन्यांपासून जीआर जारी झालेला नाही. येथून जवळच असलेल्या आनंद आश्रमात शनिवारी पहाटे 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री त्यांच्या समर्थकांना भेटत होते. मात्र, आशा आंदोलकांकडे कोणीही आले नाही. (Anganwadi Workers: खुशखबर! अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार; महिला बालकल्याण विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा)
दरम्यान, शनिवारी सकाळी वर्धा जिल्ह्यातून आलेल्या शर्मिला थूल यांनी सांगितलं की, सरकार जीआर जारी करेपर्यंत आम्ही अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू ठेवू. आशा कार्यकर्त्यांकडे तळागाळात 72 वेगवेगळी कामे आहेत आणि आमची कमाई या कामाचे स्वरूप आणि त्यात समाविष्ट असलेल्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, लसीकरण मोहिमेमध्ये, आम्हाला प्रति लसीकरण पैसे दिले जातात. काहीवेळा, आम्ही 1,000 लोकसंख्येचे गाव कव्हर करतो, परंतु बऱ्याचदा आम्ही 400 किंवा 500 लोक असलेल्या छोट्या गावात जातो आणि अशा प्रकारे दरमहा फक्त 3,000 कमावतो. म्हणूनच सर्वांना समान वेतन मिळावे, अशी आमची मागणी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)