मुथुट फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोडा: 1 ठार दोन गंभीर जखमी, नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील घटना
एकूण चार दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा घटनास्थळी पोहोचला. घटनेची गंभीर नोंद घेत पोलीसांनी तातडीने नाकाबंदी केली. तसेच, तपासही सुरु केला आहे.
Armed Robbery in Muthoot Finance office At Nashik: नाशिक शहर उंटवाडी (Untwadi Area of Nashik City) परिसरात असलेल्या मुथूट फायनान्स (Muthoot Finance) शाखा कार्यालयावर शुक्रवारी (14 फेब्रुवारी 2019) दुपारी सशस्त्र दरोडा पडला. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. भरदिवसा घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारीच नव्हे तर, अवघे नाशिक शहर थरारुन गेले.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी भरदिवसा दुपारी हा दरोडा पडला. एकूण चार दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस प्रमुख विश्वास नांगरे पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा घटनास्थळी पोहोचला. घटनेची गंभीर नोंद घेत पोलीसांनी तातडीने नाकाबंदी केली. तसेच, तपासही सुरु केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर कार्यालयातील कर्मचारी इतके घाबरून गेले होते की, घटना घडल्यानंतर बराच काळ त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गेल्या काही काळापासून नाशिक शहरात घरफोडीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यातच पडलेला हा सशस्त्र दरोडा म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याची भावना शहरवासियांमधून व्यक्त होत आहे. (हेही वाचा, ठाणे: वज्रेश्वरी मंदिरात दरोडा घालणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ठोठावल्या बेड्या)
दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला असला तरी, या घटनेचा तपास हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान मानले जात आहे. कारण, भरदिवसा सशस्त्र दरोडा पडणे म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याची उघड भावना नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत.