ठाणेकरांसाठी खुशखबर! ठाणे आणि मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी; सरकार 14 एकर जागा देणार

तसेच वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्टेशन तयार करण्यात येणार आहे. या स्टेशनचे नाव 'कोपरी' असणार आहे. या स्टेशनला ठाणे महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. हे स्टेशन उभारण्यासाठी सरकार 14 एकर जागा देणार आहे. या स्टेशनच्या उभारणीसाठी 120 कोटी रुपये खर्च येणार आहे.

Thane Railway Station | (Photo Courtesy: Wikimedia Commons)

ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे दररोज रेल्वेतून पडून अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तसेच वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्टेशन तयार करण्यात येणार आहे. या स्टेशनचे नाव 'कोपरी' (Koparo Railway Station) असणार आहे. या स्टेशनला ठाणे महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. हे स्टेशन उभारण्यासाठी सरकार 14 एकर जागा देणार आहे. या स्टेशनच्या उभारणीसाठी 120 कोटी रुपये खर्च येणार आहे. (हेही वाचा - ठाणे रेल्वे स्टेशन आता अधिक सुरक्षित; गुप्तचर विभागाच्या मदतीने 'ब्ल्यू प्रिंट' तयार, शॉर्टकट मारणाऱ्या प्रवाशांची गच्छंती)

ठाणे-मुलुंडदरम्यान दिवसाला 4 ते 5 प्रवासी गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. मध्य रेल्वेवर दिवसाला 12 जण मृत्युमुखी पडतात. मागील 5 वर्षांत अंदाजे 3 हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या 63 एकर जागेपैकी 14 एकर जागा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हस्तांतरित करण्यात येणार आहे. (हेही वाचा - मुंबई: स्वच्छ रेल्वे स्टेशन 2019 च्या यादीमध्ये अंधेरी स्थानक ठरले देशातील सर्वात स्वच्छ उपनगरीय रेल्वे स्थानक; टॉप 10 मध्ये विरार, नायगाव चाही समावेश)

ठाणे मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्टेशनसाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडून 2017 मध्येच मंजुरी मिळाली आहे. कोपरी रेल्वे स्टेशन प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे हस्तांतरण प्रक्रियेला विलंब लागत होता. परंतु, आता लवकरच ठाणेकरांना कोपरी रेल्वे स्टेशमुळे दिलासा मिळणार आहे. कोपरी रेल्वे स्टेशनमुळे ठाणे रेल्वेस्थानकातील 31 टक्के व मुलुंड रेल्वेस्थानकातील 24 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.