महाराष्ट्र पर्यटन विकास धोरणास मंजूरी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मानले मंत्रिमंडळाचे आभार
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोनाशी झुंज देत आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगार निर्माण झाला आहे. मात्र, महाराष्ट्र 3 जूनपासून लॉकडाउनच्या काही नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विभागाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्याबाबत महत्वाची दोन धोरणे पारित केले आहे. ज्यामुळे पर्यटन व पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पर्यटन विभागातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील 8 समुद्र किनाऱ्यांना इको फ्रेंडली बीच शॅकसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना समुद्रकिनारी ही एक मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिकांना 80 टक्के रोजगार देणे आवश्यक आहे. एमटीडीसीच्या 7 मालमत्ता 90 वर्षांसाठी लीज/JV वर असतील. यामुळे राज्याला वाढीव महसूल मिळण्यास मदत होईल आणि जगातील सर्वोत्तम हॉटेल ब्रँडच्या भागीदारीसह महाराष्ट्रात जागतिक स्तरावरील पर्यटन क्षेत्र तयार होईल, अशा आशायाचे ट्विट अदित्य ठाकरे यांनी केले आहे. हे देखील वाचा-Maharashtra Unlock 2.0: महाराष्ट्रात Gym आणि धार्मिक कार्यक्रम सुरु करण्याबाबत मंत्री अस्लाम शेख यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती
अदित्य ठाकरे यांचे ट्विट-
कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत केल्यानंतर अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. ज्यामुळे अनेकांनी रोजगार गमवला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यामांना सांगितले आहे.