मुंबई मध्ये NCP नेते Vijay Koli यांना Drugs Case मध्ये गोवण्याचा कट पोलिसांकडून उघड; 5 जणांना अटक
मुंबई पोलिसांच्या अमलीपदापर्थ विरोधी पथकाने या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे.
मुंबई मध्ये मागील काही महिन्यांपासून ड्र्ग्स रॅकेट मध्ये अनेक मोठी नावं समोर आली आहे. Anti Narcotics Cell कडून मुंबई मध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पण नुकतेच या धाडसत्राचा फायदा घेत राजकीय वैमनस्यातून एनसीपी नेता विजय कोळी यांना त्यामध्ये गोवण्याचा एक कट मुंबई पोलिसांनी उधळला आहे. मुंबई पोलिसांच्या अमलीपदापर्थ विरोधी पथकाने या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव विजय कोळी यांनी एका स्थानिक बांधकामाला विरोध केला होता. त्या विरोधात पोलीस आणि महापालिकेकडे तक्रार देखील दाखल केली आहे. नेमका त्याचाच राग मनात धरुन त्यांना ड्रग्स केस मध्ये रोवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
दक्षिण मुंबई माध्ये ताडदेव परिसरामध्ये अनधिकृत झोपड्यांना अधिकृत करण्याचा एकाचा डाव होता. पण हा प्रकार कोळी यांनी बीएमसी व पोलिसांच्या लक्षात आणून दिला. या प्रकरणामध्ये अब्दुल अजीज शेख उर्फ अज्जू हा मुख्य सूत्रधार आहे. त्याने विजय कोळी यांना ड्रग्स केस मध्ये अडवण्यासाठी इतर आरोपींना लाच दिली. अब्दुलचे राजकीय मतभेद देखील होते. अशी माहिती डिसीपींनी दिली आहे.
दरम्यान 9 जानेवारीला मुंबई पोलिसांनी अय्याज मांडवीवाला या व्यक्तीला त्याच्याकडे 150 grams mephedrone (MD)आढळल्याने अटक केली होती. त्याच्याकडे या प्रकार पोलिसांना समजला. मांडवीवाला याने ति हे ड्र्ग्स कोळी यांच्या गाडीमध्ये ठेवणार होता अशी कबुली दिली आहे. पण त्याआधीच त्याने पोलिसांना त्याची टीप दिली. यामध्ये anti-drug organisation चा चेअरपर्सन असिफ सरदार, Nabi Shaikh आणि Jafar Shaikh यांना देखील अटक झाली आहे.