Mumbai Accident: शहरात आणखी एक Hit And Run प्रकरण, कारची दुचाकीला धडक; खासदाराचा मुलगा गणेश हंडोरे याला अटक
तशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत शनिवारी चेंबूर मार्गावर दुचाकीचा अपघात घडला होता. एसयुव्ही कारची दुचाकीला धडक लागल्याने हा अपघात घडला होता.
Mumbai Accident: शहरात दिवसेंदिवस हिट अॅड रन (Hit-And-Run ) प्रकरण वाढत चाललेलं आहे. तशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत शनिवारी चेंबूर मार्गावर दुचाकीचा अपघात घडला होता. एसयुव्ही कारची दुचाकीला धडक लागल्याने हा अपघात घडला होता. या प्रकरणी शहरातील खासदार आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री चंद्रकांच हंडोरे यांचा मुलाला पोलिसांनी अटक केले आहे. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. (हेही वाचा- लातूर - औसा महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, आईसह सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हंडोरे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो ज्यूस घेण्यासाठी कारमधून चेंबूर पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने जात होता. रात्री १२,०० च्या दरम्यान ही घटना घडली. त्यांची कार वैभव नगर येथील नारायण गजानन आचार्य मार्गावरील आचार्य महाविद्यालय परिसरात आले असता एका तरुणाच्या दुचाकीला त्यांची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकी काही अंतर फरफटली.
दुचाकीवरून तरुण गंभीर जखमी झाला. गोपाल असं त्याचे नाव आहे. धडक झाल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून घाबरून पळाला. अपघात पाहून स्थानिकांनी गर्दी केली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गोपालला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु केले. त्यांनी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीचा शोध सुरु केला. वाहन चालकाची ओळख पटल्यानंतर गणेशला राहत्या घरातून चेंबूर पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याची कार जप्त केली.