Anil Deshmukh Slams Kanagana Ranaut: मुंबई, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणणार्यांचे नाव घेण्याचीही पात्रता नाही- अनिल देशमुख यांचा कंगनाला टोला
वास्तविक अनिल देशमुख यांंनी कंंगना किंंवा विरोधी पक्ष भाजप (BJP) यांंचे नाव ही घेतले नाही पण त्यांंच्या बोलण्याचा ओघ आणि टोक याच दोघांंवर रोखलेले होते हे सहज लक्षात येतेय.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांनी आज पुणे (Pune) येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सन्मान खाकी वर्दीचा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, यावेळी देशमुख यांंच्या हस्ते कोरोना काळात विशेष कामगिरी करणाऱ्या राज्यातील अनेक भागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात बोलत असताना अनिल देशमुख यांंनी नाव ही न घेता कंंगना रनौत (Kangana Ranaut) वर तसेच तिला पाठिंंबा देणार्या राजकीय पक्षांंवर टीका केली आहे. वास्तविक अनिल देशमुख यांंनी कंंगना किंंवा विरोधी पक्ष भाजप (BJP) यांंचे नाव ही घेतले नाही पण त्यांंच्या बोलण्याचा ओघ आणि टोक याच दोघांंवर रोखलेले होते हे सहज लक्षात येतेय. Kangana Ranaut ने मुंबई कोर्टात दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या याचिकेवर आव्हान देत BMC ने दिले उत्तर, म्हणाली 'कंगनाची याचिका कायदेशीर प्रक्रियेचा अवमान करणारी आहे'
कंंगना ने मुंंबईला पाकिस्तान तसेच मुंंबई पोलिसांंना माफिया म्हंंटले होते याच पार्श्वभुमीवर अनिल देशमुख यांंनी टीका केली आहे. मुंबईला, महाराष्ट्राला पाकिस्तान म्हणण्याचं काम, मुंबई पोलिसाला माफिया म्हणण्याचं काम ज्या कुणी व्यक्तीनं केलं. एकाप्रकारे महाराष्ट्राच्या अस्मितेला दुखवण्याचं काम केलं. अशा या व्यक्तीला जेव्हा एखादा राजकीय पक्ष खतपाणी घालण्याचं काम करतो. तर त्याचा देखील विचार समाजाने करायला पाहिजे असे अनिल देशमुख यांंनी म्हंंटले आहे. तसेच मी असे बोलणार्या त्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचा प्रश्न नाही, ती काय नाव घ्यायच्या लायकीची नाही. असेही देशमुख यांंनी म्हंंटले आहे.
ANI ट्विट
पुढे, अनिल देशमुख म्हणतात की, राजकीय फायदासाठी जर काही गोष्ट अशा पद्धतीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन होत असेल, तर हा सुद्धा एक गंभीर विषय आहे, या सगळ्यात समाजाने आपली भुमिका घेण्याची गरज आहे.
दुसरीकडे कंंगना सध्या हिमाचल प्रदेश मध्ये आहे तिथुनही तिची ट्विट मालिका सुरुच आहे. आज राज्यसभेत कृषी विधेयक मंंजुर झालेले असताना त्यांंना विरोध करणार्यांंना टार्गेट करत कंंगनाने हे तेच दहशतवादी लोक आहेत ज्यांंनी CAA ला विरोध केला होता आणि आता कृषी विधेयकाला विरोध करत आहेत. अशा आशयाचे ट्विट आज कंंगनाने केले होते ज्यावरुन आता पुन्हा नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.