Anil Deshmukh Arrested: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मध्यरात्री ED कडून अटक
त्यांच्या अटकेबद्दलची माहिती ईडीने दिली होती.
Anil Deshmukh Arrested: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजता ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबद्दलची माहिती ईडीने दिली होती. ईडी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी बळजबरीने केलेली वसूली आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीचे संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार हे स्वत: अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीत पोहचले होते.
यापू्र्वी ईडीकडून वारंवार चौकशीसाठी अनिल देशमुख यांना बोलावले जात होते. परंतु ईडी चौकशीला त्यांनी योग्य मदत केली नाही. आज अनिल देशमुख यांना कोर्टा हजर केले जाणार आहे, ANI यांच्यानुसार, अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी म्हटले की साडे चार करोज रुपयासंबंधित या प्रकरणातील तपासात आम्ही मदत करत आहोत. आज ज्यावेळी देशमुख यांना कोर्टात हजर केले जाईल त्याचवेळी आम्ही त्यांच्या रिमांडसाठी विरोध करणार आहोत.(सचिन वझे याला 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, न्यायालयाचे आदेश)
Tweet:
ईडीने स्पष्टपणे सांगितले की, देशमुख यांनी चौकशीत कोणताही मदत केली नाही. यासाठीच त्यांना अटक केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री सकाळी आपल्या वकीलांसह 11 वाजून 40 मिनिटांनी दक्षिण मुंबईतील बलार्ड इस्टेट परिसरातील तपास एजेंसीच्या कार्यालयात पोहचले होते. ईडीचे अधिकारी सातत्याने त्यांची चौकशी करत होते. त्याचसोबत या संबंधित अधिक माहिती मिळवण्याचा ही प्रयत्न केला गेला. तर वसूलीच्या कारणास्तव देशमुख यांना एप्रिल महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.