Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: राज ठाकरे यांनी घेतलं आंगणेवाडीच्या भराडी देवीचं दर्शन

दीड दिवसांच्या भराडी देवीच्या दीड दिवसाच्या यात्रेमध्ये राज ठाकरे यांनी भराडी देवीचे दर्शन घेतले.

Bharadi Devi Jatra 2019 (Photo Credits: Twitter

Anganewadi Bharadi Devi Jatra 2019:  आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या वार्षिक जत्रेला आजपासून सुरूवात झाली आहे. या यात्रेसाठी देशा-परदेशातून नागरीक मोठ्या संख्येने भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी आंगणे गावामध्ये पोहचले आहेत. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या कोकणातील मालवण(Malvan) येथील भराडी देवी (Bharadi Devi ) नवसाला पावते या श्रद्धेपायी तिच्या वार्षिक उत्सवाला मोठी गर्दी असते. यंदा आगामी लोकसभा निवडणुकींच्या (Loksabha Election 2019) धामधूमींदरम्यान भराडीदेवीची यात्रा आल्याने अनेक राजकीय मंडळी या जत्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भराडीदेवीचं दर्शन घेतलं आहे. यावेळेस मनसेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.  Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी

दीड दिवसांच्या भराडी देवीच्या दीड दिवसाच्या यात्रेमध्ये राज ठाकरे यांनी भराडी देवीचे दर्शन घेतले.  या यात्रेमध्ये यंदा राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. सुमारे 8 लाख भाविक यंदा भराडीदेवीचं दर्शन घेणार आहे असे सांगण्यात आले आहे. यंदा देवीच्या दर्शनासाठी नऊ खास रांगा आहेत. व्हिआयपी दर्शनासाठी एक रांग आरक्षित ठेवण्यात आली आहे. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवीला भोपळ्याच्या वड्यांचा प्रसाद , 'ताट लावणं' प्रथा म्हणजे काय?

भराडीदेवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. आज आणि उद्या अशी दोन दिवस ही भराडीवाडीची जत्रा रंगणार आहे.