अंधेरी: मोबाईल चोरीसाठी भामट्याने प्रवाशाला लोकल बाहेर खेचले, प्रवासी जखमी
या मध्ये सदर प्रवासी जखमी झाला आहे.
लोकलमधून गर्दीच्या वेळेस प्रवास करणे फारच मुश्किल होते. तसेच या दरम्यान चोरांचा सुळसुळाट अधिक असल्याने मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याची सुचना लोकलमध्ये वारंवा देण्यात येते. तर लोकलमध्ये दरवाजाच्याकडेला उभे राहून मोबाईलवर पाहणे सुद्धा चुकीचे आहे. पण तरीही प्रवाशांकडून तसे केले जाते. याच पार्श्वभुमीवर लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल भामट्याने हिसकवण्यासाठी त्याला सुद्धा लोकल बाहेर ओढल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला आहे. या मध्ये सदर प्रवासी जखमी झाला आहे.
संतोष कुमार मौर्य असे तरुणाचे नाव आहे. संतोष हा अंधेरी स्थानकात उतरुन विले पार्ले येथे जाण्यासाठी निघाला होता. लोकल गच्च गर्दीने भरली असल्याने उभे राहण्यास नीट जागा नव्हती. त्याचवेळी एका सहप्रवाशाने चोर चोर म्हणून ओरडले असता संतोष याने त्याचा सुद्धा खिशा तपासला. तर तोपर्यंत चोराने धावत्या लोकल मधून उडी मारत संतोष याला सुद्धा लोकल बाहेर खेचल्याचा प्रकार घडला. तर लोकलमधून खाली उडी मारलेल्या भामट्याला प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी पकडून पोलिसांकडे दिले आहे.(मुंबई लोकलमध्ये महिला असुरक्षित; रेल्वे सर्वेक्षणात समोर आलेली आकडेवारी ठरली धक्कादायक बाब)
गेल्या महिन्यात डोंबिवली - कोपर स्थानकादरम्यान सकाळच्या वेळेस चार्मी पासड या तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. सकाळी गर्दीच्या वेळेस तिचा गाडी पकडताना हात सुटला. जखमी अवस्थेमध्ये असलेल्या तरूणीला तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला रूग्णालयात नेले मात्र तिला मृत घोषित करण्यात आले होते.