Andheri East By Poll: ऋतुजा लटके यांचा राजीनामा रखडण्यामागे शिंदे गटाचा दबाव, कोर्टात दाद मागणार - अनिल परब

बीएमसी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर शिंदे- फडणवीस सरकारचा दबाव असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

अनिल परब | (File Photo)

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूकीमध्ये (Andheri East By Poll) रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पण त्या बीएमसी मध्ये लिपिक असल्याने प्रशासकीय सेवेतील राजीनामा मंजूर झाल्याशिवाय अर्ज सादर करण्यामध्ये अडचण निर्माण होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर पेच उभा राहिला आहे. आज अनिल परब (Anil Parab) यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकार वर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांच्या दाव्यानुसार सेवा आणि शर्तींनुसार राजीनामा देऊनही ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला जात नाही. दोन वेळेस त्यांच्याकडून राजीनामा देण्यात आला आहे पण तो रखडण्यामागे शिंदे गटाचा हात असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

बीएमसी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यावर शिंदे- फडणवीस सरकारचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ऋतुजा लटके आणि त्यांच्या परिवारावरही शिंदे गटाचा दबाव असल्याचं सांगितलं जात आहे. ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्याचा शिंदे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये आता उद्धव ठाकरे गट कोर्टात दाद मागणार असल्याचेही अनिल परब यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Andheri Bypoll 2022: ऋतूजा लटके शिंदे गटाच्या गळाला? जयंत पाटील यांनी वर्तवले भविष्य, काय म्हणाले पाहा .

रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज सादर करण्याची 14 ऑक्टोबर पर्यंतच मुदत आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून घाई केली जात आहे. दरम्यान 3 नोव्हेंबरला अंधेरीची पोट निवडणूकीसाठी मतदान होणार आहे आणि 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif