डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यतिथी दिवशी अंनिस कडून 'जबाब दो आंदोलन'

तसेच 20 ऑगस्टला सकाळी 9 वाजता सूत्रधार कधी पकडणार जबाब दो आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे

Dr. Narendra Dabholkar (Photo Credits: Twitter)

यंदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या यांच्या हत्येला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी दाभोलकरांवर गोळीबार करण्यात आला. सध्या या हत्येचा तपास सुरू असून सीबीआयने सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना दाभोलकरांच्या हत्येचा तपास सुरू आहे. आज दाभोलकरांचा मुलगा हमीद दाभोलकरने पत्रकार परिषद घेऊन यंदा त्यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून 19 ऑगस्टच्या संध्याकाळी कॅन्डल मार्चचं आयोजन केले आहे. तसेच 20 ऑगस्टला सकाळी 9 वाजता सूत्रधार कधी पकडणार जबाब दो आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे.

पुण्याच्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अमोल काळे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा यांच्यावर वेळीच आरोपपत्र दाखल असती तर त्यांना जामीन मंजूर झाला नसता असे मत हमीद यांनी व्यक्त केले आहे.

नरेंद्र दाभोलकरांनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलिबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून हे खून सारख्याच उद्दिष्टाने करण्यात आल्याचे दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.