Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'या' मागणीला आनंद महिंद्रा यांचा पाठिंबा
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (5 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीकरणाबाबत पत्र लिहले होते.
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (5 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीकरणाबाबत पत्र लिहले होते. तसेच 25 वर्षांपुढील सर्वांना कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवर अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केले आहे. याचदरम्यान, महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र संपूर्ण लॉकडाऊन न केल्यामुळे मुख्यमंत्र्याचे आभार मानतो. लॉकडाऊनमुळे छोट्या दुकानदारांना अनेक अडचणींचा सामोरे जावा लागते, त्यांच्या बद्दल मला वाईट वाटते. आता या कोरोनासंबंधित नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. जेणेकरुन ही बंधने लवकरात लवकर किंवा मागे घेतली जातील, अशा आशयाचे ट्वीट करत आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शवला आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे पंतप्रधान Narendra Modi यांना पत्र; 25 वर्षापुढील सर्वांना कोरोनाची लस देण्याची केली विनंती
आनंद महिंद्रा यांचे ट्वीट-
महाराष्ट्रात काल (सोमवारी, 6 मार्च) 47 हजार 288 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 26 हजार 252 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 25 लाख 49 हजार 075 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 4 लाख 51 हजार 375 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.36% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.