मुंबई: कुलाबा येथे ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांकडून 3 जणांना अटक
मुंबईतील कुलाबा येथे एका हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळल्यानंतर त्यांनी या हॉटेलवर धाड टाकत 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
मुंबईतील कुलाबा येथे एका हॉटेलमध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळल्यानंतर त्यांनी या हॉटेलवर धाड टाकत 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून 3 जणांना अटक केली आहे. सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
तर शनिवारी प्रभादेवी येथील सिद्धीविनियाक होरीझॉन या इमारतीत स्पा सेंटर सुरु होते. मात्र स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापेमारी करत 9 तरुणींची सुटका केली असून सलीम शेख नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.(Sex Racket: पुण्यात 2 हिंदी आणि मल्याळम अभिनेत्रींचा वेश्याव्यवसाय; ग्राहक बनून पोलिसांचा छापा, डॉक्टर दलाल अटकेत)
DCP Shivdeep Lande: An online escort service racket was busted, yesterday after a raid was carried out at a hotel in Colaba, Mumbai. 2 women and a girl (minor) were rescued. Case has been registered and 3 accused arrested. Further investigation underway. #Maharashtra
— ANI (@ANI) December 22, 2019
काही दिवसापूर्वीच चारकोप परिसरातील एका गृहिणीने घरातच सेक्स रॅकेट चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती कामावर आणि मुलगी कॉलेजसाठी घराबाहेर पडताच ही महिला घरातूनच सेक्स रॅकेट चालवायची, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी 56 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती.
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2019 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

