Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँगची मालिका सुरूच, बहिणीची छेड काढल्यामुळे भावाने उचलला कोयता
एका मुलीची छेड काढल्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली आहे.
Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गॅंगची मालिका सुरुच आहे, गेल्या महिन्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तीच्या प्रियकराने तिच्यावर कोयत्याने वार केला. एका मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका युवकावर मुलीच्या भावाने कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दांडेकर पूल परिसरात घडली आहे. जखमी तरुणांने या घटनेची माहिती पर्वती पोलीस ठाण्यात देण्यात आली. आरोपीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुण्यात कोयत्या गॅंगमुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रेयस खंदारे (१६) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार अभिजीत पाटील, संकेत लोंढे, प्रमोद कळंबे, बिट्या कांबळे, अनंता खोले, आज्या उर्फ अजित, शुभम गजधने, तसेच अब्दुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दांडेकर परिसरातून श्रेयस जात असताना अभिजीतने त्याच्या बहिणीची छेड का काढली,अशी विचारणा करून वादविवाद घातला वादविवादातून त्याच्यांत चागंलीच मारमारी सुरु झाली. दरम्यान अभिषेकने कोयत्याने गंभीर वार केला. यावेळी घटनेनंतर गॅंगने कोयता उगारुन दहशत माजविली. पोलिसांकडे जर तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी देखील गुंड्यांनी दिली.
या प्रकरणात पोलिस कंबर कसून तपास करित आहे. तक्रारादाराची बहीण टीव्हीचा रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी नव्या वाडकरने तिला कोयता फेकून मारला. अशी घटना देखील समोर आली आहे. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नागरिकांच्याही मनात भास्ती भरली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.टी. जगदाळे तपास करीत आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 10:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

