मुंबई: लग्नाचे आमिष दाखवून एका टीव्ही अभिनेत्रीवर आरोपीने केला अनेकदा बलात्कार, ओशिवरा पोलिस स्टेशनात FIR दाखल

या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी FIR नोंदविला असून या घटनेचा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी IPC कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस चौकशी सुरु आहे.

मुंबई: लग्नाचे आमिष दाखवून एका टीव्ही अभिनेत्रीवर आरोपीने केला अनेकदा बलात्कार, ओशिवरा पोलिस स्टेशनात FIR दाखल
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

मुंबईत (Mumbai) मध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न करणार असल्याचे खोटं सांगून एका टीव्ही अभिनेत्रीवर आरोपीने अनेकदा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने ओशिवारा पोलिस स्टेशनात (Oshiwara Police Station) नोंदवली आहे. या आरोपीने आपल्यावर अनेक ठिकाणी अनेकदा बलात्कार केला असल्याचे अभिनेत्रीने आपल्या FIR मध्ये सांगितले आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी FIR नोंदविला असून या घटनेचा अधिक तपास करत आहे. याप्रकरणी IPC कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस चौकशी सुरु आहे.

सिनेसृष्टीत लग्न करणार असल्याचे खोटं कारण सांगून वा काम देणार असल्याच्या बहाण्याने अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. सदर घटनेत पोलिस अधिक तपास करत आहेत.हेदेखील वाचा- मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

काही दिवसांपूर्वी अशाच एका टीव्ही अभिनेत्री (TV Actor) आणि मॉडेल असलेल्या एका महिलेने एका वैमानिकावर बलात्काराचा (Rape) आरोप केला होता. लग्नाचे आमिष दाखवून पायलटने आपल्यावर वारंवार बलात्कार (Rape on Pretext of Marriage) केला असा आरोप या महिलेने पायलटवर केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन संबंधित पायलटवर मुंबई येथील ओशिवारा पोलीस स्टेशन (Oshiwara Police Station) मध्ये गुन्हा सोमवारी (18 जानेवारी) दाखल करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, संबंधित आरोपी आणि महिला यांची ओळख डिसेंबर 2020 मध्ये एका मैट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून झाली. दोघांचा परिचय झाला. त्यातून मैत्री वाढली. पायलटने तरुणीला लग्नाचे वचन दिले. त्यातून त्याने तिच्यावर बलात्कार केला. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला, असे महिलेचे म्हणणे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2021 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).