Palghar Earthquake: पालघरसह डहाणू, तलासरी परिसर भूकंपाच्या धक्क्याने थरथरला
या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचा (Earthquake) मोठा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल (Richter Scale) एवढी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) दिली आहे.
गेल्या दीड वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील परिसरात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. शनिवारी पहाटे पालघरमधील काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचे धक्के जाणवले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घरातील भीतींना तडे गेले आहेत. परंतु, यात कोणतेही नुकसान झाले नाही. (हेही वाचा - Palghar Earthquake Tremors: पालघर जिल्हा पुन्हा 5 वेळा भूकंपाच्या धक्क्याने हादरला, डहाणू, तलासरी मध्ये भीतीचं वातावरण)
पालघर जिल्ह्यात नेहमी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. परंतु, या भूकंपाच्या धक्क्याचे कारण शोधण्यास शासकीय यंत्रणा अपयश ठरली आहे. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असले तरी या भूकंपाने घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, तडे गेलेल्या घरांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव आणखीही पूर्ण झालेले नाहीत.