सचिन वाझे प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका (View Tweet)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो आढळल्या प्रकरणी एपीआय सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
सध्या राज्यात सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो आढळल्या प्रकरणी एपीआय सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन विरोधक पेटून उठवले असून सत्ताधारी सचिन वाझे यांची पाठराखण करताना दिसत आहेत. या प्रकरणी एकच वादंग निर्माण झाला असून विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. (Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात CCTV मध्ये दिसणाऱ्या 'त्या' व्यक्तीबाबात NIA चा मोठा खुलासा)
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "एकीकडे नागपूर सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटर्समध्ये भष्ट्राचार करत आहे आणि उद्योगपतींना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना काही हस्तकांसोबत मिळून करत आहे."
अमृता फडणवीस ट्विट:
यापूर्वी देखील अनेकदा अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अर्नब गोस्वामी प्रकरणातही अमृता यांनी महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले होते. आपल्या बेधकड आणि स्पष्टोक्तेपणामुळे अमृता फडणवीस कायम चर्चेत असतात.
दरम्यान, या प्रकरणी सचिन वाझे यांचे निलंबन झाले असून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. NIA या प्रकरणाचा तपास करत असून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे.