Umesh Kolhe Murder Case: अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंध, एनआयएचा मोठा खुलासा
मौलवी मुशफिकचे कनेक्शन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. कोल्हे हत्येमध्ये या संघटनेचा किती आणि कितपत सहभाग आहे, या दृष्टिकोनातून एनआयएने आता तपास सुरू केला आहे.
अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचे (Umesh Kolhe Murder Case) पीएफआय (PFI) या कट्टर इस्लामिक संघटनेशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने (NIA) हा खुलासा केला आहे. मौलवी मुशफिकचे कनेक्शन पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेशी संबंधित असल्याचे समजते. कोल्हे हत्येमध्ये या संघटनेचा किती आणि कितपत सहभाग आहे, या दृष्टिकोनातून एनआयएने आता तपास सुरू केला आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल अमरावती येथे राहणाऱ्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. अमोल कोल्हे यांच्या हत्येपूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकण्यासाठी धमक्या येत होत्या, असा दावा भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला होता. उदयपूरच्या कन्हैयालालची जशी हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी हे प्रकरण दडपून सत्य सांगितले नसते, तर कोल्हे यांच्या हत्येनंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या थांबवता आली असती. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर आरोप केला होता की, अमरावती पोलीस नुपूर शर्माच्या पाठिंब्यामुळे हत्येचा कोन लपवत आहेत आणि हत्येचे कारण डकैतीला सांगत आहेत. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.
पीएफआय कनेक्शनबाबत एनआयएची चौकशी सुरू
अमोल कोल्हे हत्येशी पीएफआय या इस्लामिक संघटनेच्या संबंधाबाबत एनआयएचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हेच्या हत्येचा मास्टर माईंड इरफान शेख हा मौलवी मुशफिक अहमदला आपला आदर्श मानतो. मौलवी मुशफिकचे पीएफआयशी असलेले संबंध चव्हाट्यावर आले आहेत. मुशफिकच्या सांगण्यावरून नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट फॉरवर्ड केल्याबद्दल अमोल कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. (Satara Crime: दहा महिन्याच्या बाळाला विहीरीत फेकलं, घरगुती वादातून घटना)
एनआयए या प्रकरणाचा सखोल तपास
मुशफिक अहमद हे मौलवी आहेत. तसेच अब्दुल अरबाज हा रुग्णवाहिकेत चालक आहे. या दोघांनी कोल्हे खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार इरफान खान आणि इतर आरोपींना हत्येनंतर लपण्यासाठी मदत केली होती. एनआयएच्या नव्या खुलाशानुसार मुशफिक हा कट्टरपंथी इस्लामिक संघटना पीएफआयशी संबंधित आहे. सध्या एनआयए या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)