Maharashtra Assembly Elections 2024: अमित शहांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; नागपूरहून अचानक दिल्लीला रवाना

अमित शहा आज महाराष्ट्रात चार जाहीर सभांना संबोधित करणार होते. प्राप्त माहितीनुसार, मणिपूर हिंसाचारामुळे त्यांचा निवडणूक दौरा रद्द करण्यात आला होता. शाह हे मणिपूरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि उच्च अधिकाऱ्यांकडून अपडेट्स घेत आहेत.

Amit Shah (फोटो सौजन्य - ANI)

Maharashtra Assembly Elections 2024: केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री नागपूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. अमित शहा आज महाराष्ट्रात चार जाहीर सभांना संबोधित करणार होते. प्राप्त माहितीनुसार, मणिपूर हिंसाचारामुळे (Manipur Violence) त्यांचा निवडणूक दौरा रद्द करण्यात आला होता. शाह हे मणिपूरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि उच्च अधिकाऱ्यांकडून अपडेट्स घेत आहेत.

अमित शहा यांच्या महाराष्ट्रातील चार सभा रद्द -

अमित शहा गडचिरोली, वर्धा, काटोल आणि सावेर येथे निवडणूक सभा घेणार होते. शाह यांच्या जागी आता स्मृती इराणी या ठिकाणी निवडणूक रॅली घेणार आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. एकाच टप्प्यात 288 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार उद्या संपणार आहे. त्यामुळे आज अमित शहा भाजप उमेदवारांसाठी प्रचार करणार होते. परंतु, मणिपूर हिंसाचारामुळे अचानक त्यांच्या सर्व रॅली रद्द करण्यात आल्या. (हेही वाचा -Rahul Gandhi, Sharad Pawar Helicopter Check by EC Officials: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी)

मणिपूरमध्ये अनेक भागात संचारबंदी लागू -

मणिपूरमधील परिस्थिती पाहून डीजी सीआरपीएफ मणिपूरला रवाना झाले आहेत. तेथे जाऊन ते कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवा आदेश काढण्यात येत आहे. कर्फ्यू शिथिल करण्यात आलेल्या मणिपूरमधील काही भागात पुन्हा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता बिष्णुपूर, इंफाळ आणि जिरीबिम भागात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (हेही वाचा -Govinda Health Update: महाराष्ट्र निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, रोड शो अर्ध्यावरच सोडून हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना)

दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून आहे. डीजी सीआरपीएफच्या मणिपूर दौऱ्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकही लवकरच राज्याला भेट देणार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी हिंसक कारवाया करणाऱ्या आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now