COVID-19 च्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या यंदाच्या अभ्यासक्रमातही 25% कपात; मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

त्यामुळे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

Education | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना संकट अजूनही पूर्णपणे शमलेले नसल्याने यावर्षी देखील शैक्षणिक वर्ष हे ऑनलाईन पद्धतीनेच सुरू करण्यात आले आहे अशामध्ये आता शालेय शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मोठी दिलासादायक बातमी आहे. यावर्षी देखील शालेय शिक्षण विभागाने एकूण अभ्यासक्रमाच्या 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती ट्वीट करत दिली आहे.

भारतासह जगभरात मागील दीड वर्षांपासून कोरोना वायरस धुमाकूळ घालत आहे. येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट पाहता सरकारने अद्यापही शाळा, कॉलेज बंद ठेवली आहेत. विद्यार्थ्यांना यामुळे यंदादेखील घरीच राहून ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घ्यावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर अभ्यासक्रमात कपात व्हावी अशी मागणी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांच्याकडून करण्यात आली होती आणि आता शालेय विभागाने देखील हिरवा कंदील दिला आहे. Online Education Tips for Students: ऑनलाईन शिक्षण घेणे सोपे करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स.

वर्षा गायकवाड ट्वीट

दरम्यान महाराष्ट्रात सध्या कोविड 19 चा प्रभाव कमी झालेल्या भागामध्ये 8वी ते 12 वी चे वर्ग करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग सुरू झाले आहेत. पण अद्याप महाराष्ट्राच्या मेट्रो सिटी मध्ये वर्ग ऑनलाईनच सुरू ठेवले जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय झाला आहे.