'Suspended Leader of Opposition', विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी इंन्स्टाग्रामवर ओळख बदलली, घ्या जाणून

आपल्याविषयीच्या माहितीमध्ये 'विधान परिषद विरोधी पक्षनेता' या ओळखीत बदल करुन त्यांनी निलंबीत विरोधी पक्षनेता (Suspended Leader of Opposition) असा उल्लेख केला आहे.

Ambadas Danve | (Photo Credits: Instagram)

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान, दानवे यांनी आपली सोशल मीडिया मंच इन्स्टाग्रामवर (Instagram) असलेली स्वत:विषयीची ओळख बदलली आहे. आपल्याविषयीच्या माहितीमध्ये 'विधान परिषद विरोधी पक्षनेता' या ओळखीत बदल करुन त्यांनी निलंबीत विरोधी पक्षनेता (Suspended Leader of Opposition) असा उल्लेख केला आहे. विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या शिवीगाळ प्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या शिवीगाळ प्रकरणी त्यांनी सभाहगाच्या उपसभापती यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.

शिवगाळसदृश्य आक्षेपार्ह शब्दांचा उच्चार

राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून एक प्रस्ताव आणण्याचा मुद्दा चर्चेत होता. या वेळी या प्रस्तावावर विरोधीपक्षनेता म्हणून अंबादास दानवे यांनी जोरदार आक्षेप घेतला. या दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यातच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात विरोधी पक्षनेत्यांच्या दिशेने हातवारे केले. ज्यामुळे दानवे संतापले आणि त्यांनी एकेरी भाषा वापरत 'माझ्याकडे बोट दाखवायचे नाही. जे काय सांगायचे ते उपसभापतींना सांग' असे सूचवले. त्यातूनच समोरुन लाड यांच्याकडूनही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर आले. यावर दानवे यांनी आसन सोडून उपाध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. याच वेळी त्यांनी शिवगाळसदृश्य आक्षेपार्ह शब्द उच्चारला. या वेळी सभागृहाच्या उप-सभापती निलम गोऱ्हे या कामकाज पाहात होत्या. त्यांनी या प्रकारानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले. (हेही वाचा, Ambadas Danve Suspended: विधान परिषदेत भर सभागृहात शिवीगाळ, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे निलंबित)

पाच दिवसांसाठी निलंबन

दुसऱ्या दिवशी जेव्हा सभागृह सुरु झाले तेव्हा सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर विधान परिषद उप-सभापती निलम गोऱ्हे यांनी तत्काळ निकाल देत दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. सभागृहात चुकीचा पायंडा पाडला जाऊ नये यासाठी हे निलंबन आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या निर्णयावर विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला. तसेच, आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळावी अशी मागणी सभापतींकडे केली. मात्र, त्याला सत्ताधारी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. तसेच, अशा प्रस्तावावर चर्चा करण्याची या सभागृहाची पद्धत नाही. बहुमताने निर्णय झाला आहे. त्यामुळे उगाचच चुकीचा पायंडा पाडायला नको, असे सत्ताधाऱ्यांनी सूचवले. (हेही वाचा, Instagram Down: इंस्टाग्राम डाऊन; फीड वर Cars, Nature Views चे फोटो; Insta Reels देखील दिसत नाहीत!)

व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Ambadas Danve - अंबादास दानवे (@iambadasdanve)

दरम्यान, अधिवेशनाचा काळ असल्यामुळे सरकारने जाणीवपूर्वक हे निलंबन घडवून आणले असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. आपण सभागृहातील विरोधी पक्षनेता आहोत. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडणे हे आपले कर्तव्य आणि अधिकार आहे. अशा वेळी आपले निलंबन अधिक काळासाठी करुन सरकारने आमच्यावर अन्याय आणि स्वत:ची सूटका करुन घेतली आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी झाल्या वक्तव्याबाबत सभागृह उपसभापतींकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार की, निलंबनाचा कालावधी कमी केला जाणार याबाबत उत्सुकता आहे.