अमळनेर येथील डी.व्हाय.एस.पी राजेंद्र ससाणे यांचे कार अपघातात निधन; गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाहली श्रद्धांजली
अमळनेर (Amalner) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (D.Y.S.P) राजेंद्र ससाणे (Rajendra Sasane) हे यांच्या वाहनाला अपघात झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
अमळनेर (Amalner) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (D.Y.S.P) राजेंद्र ससाणे (Rajendra Sasane) हे यांच्या वाहनाला अपघात झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात वडाळी भोई गावच्या पुढे आज सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे. ससाणे यांच्या मृत्यूची घटना कळताच सर्वत्र पोलीस प्रशासनाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ससाणे यांना श्रद्धांजली वाहली असून ससाणे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ट्विट त्यांनी केले आहे. ससाणे हे आपल्या खाजगी वाहनातून आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र ससाणे हे आपल्या खाजगी वाहनातून नाशिक येथे घरी जात होते. दरम्यान, त्यांचे वाहन एका झाडावर आदळले. ज्यामुळे त्यांचे वाहन 150 खोल दरीत कोसळल्याने ससाणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना वडाळी भोई गावाच्या नजदीक घडली. त्यांच्या या मृत्यूने ससाणे कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आज अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ससाणे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा आशायाचे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. हे देखील वाचा- जळगाव: रुग्णालयाच्या शौचालयात आढळला मृतदेह; दोषींवर कडक कारवाई करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा
अनिल देशमुख यांचे ट्विट-
या घटनेचे वृत्त कळताच चांदवड टोल प्लाझा वरील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, त्यांनी ससाणे याच्या खिशातून ओळखपत्रे काढले गेले. त्यावेळी ते अमळनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर तातडीने अमळनेरलाही ही माहिती देण्यात आली. तसेच त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.