Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan 2021: आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात, संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट

संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.

(Photo Credit - Twitter)

आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) नाशिकमध्ये (Nashik) सुरुवात होणार आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. या साहित्य संमेलनावर कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरियंटचे सावट दिसुन येत आहे. त्यामुळ साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या  50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे.

 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नाॅलेज सिटी कॅम्पस्, आडगाव, नाशिक येथे आयाेजित करण्यात आले आहे. मराठी साहित्य संमेलनाला आज दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Narlikar), मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. (हे ही वाचा Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2021: महापरिनिर्वान दिनी चैत्यभूमीवर उपस्थित राहता येणार असले तरी जिथे असाल तेथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा, महापौर किशोरी पेडणेकर यांचे अवाहन.)

साहित्य संमेलनात अवकाळी पावसाचे सावट

काल सकाळपासूनच नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळं साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचलंय, त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहेत. पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

साहित्य संमेलनात भाजप नेत्यांना डावळण्याचा प्रर्यत्न

साहित्य संमेलन एकतर्फी होत असल्याची टीका भाजप आमदारांनी केली आहे, कारण आखिल भारतीय साहित्य संमेलनात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे तर भाजप नेत्यांना निमंत्रण न देता त्याना साहित्य संमेलनात डावळण्याचा प्रर्यत्न केला आहे. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now