Nashik: भंडारा दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची तपासणी होणार- छगन भुजबळ
यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता.
भंडारा (Bhandara Hospital Fire) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली होती. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दुपारी रुग्णालयात दाखल दाखल होऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याचदरम्यान, भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची बांधकाम, फायर ऑडिट आणि दुरुस्तीचे कामे तातडीने पूर्ण करण्यावी, यावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाराष्ट्रासाठी शनिवारची (9 जानेवारी) पहाट दुर्दैवी ठरली आहे. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात () मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यातच भंडाऱ्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची बांधकाम तसेच अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन फायर ऑडिट करण्यात यावे तसेच सर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्याना केल्या आहेत. हे देखील वाचा- Uddhav Thackeray Bhandara Visit: भंडारा येथे पीडितांच्या कुटुबीयांची भेट घेतल्यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले 'मी फक्त हात जोडून उभा राहिलो'
भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेला विरोधी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या हालगर्जीपणामुळेच ही घटना घडली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.