IPL Auction 2025 Live

अकोला: राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; मतीन पटेल असे मृत व्यक्तीचे नाव

अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, अनुचित प्रकार टाळण्यासाठी एसआरपीएफची तुकडीही तैनात करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

राजकीय वादातून दोघा कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट येथील मोहाळे गावात घडली. या दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी झाला. मतीन पटेल असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. ही घटना घडल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. यापुढचा कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार,मतीन पटेल आणि आणखी एका व्यक्तीवर अज्ञातांनी हल्ला केला. या मतीन पटेल हा व्यक्ती जागेवरच ठार झाला. तर, त्याच्यासोबत असणाऱ्या आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. (हेही वाचा, मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत इमारतीचा स्लॅब कोसळला; दोन जखमी)

दरम्यान, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे दोन जमाव एकत्र आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती मिळताच अकोट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अकोट ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच, अनुचित प्रकार टाळण्यासाठी एसआरपीएफची तुकडीही तैनात करण्यात आली आहे.