Akola School Girls Molestation: अकोला येथे शाळकरी मुलींचा विनयभंग; POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; शिक्षकास अटक

अकोला (Akola Molestation Case) जिल्ह्यातील सरकारी शाळेतील एका 47 वर्षीय शिक्षकाला अटक (Teacher Arrested) करण्यात आली आहे. प्रमोद मनोहर सरदार असे या शिक्षकाचे नाव आहे. शाळकरी विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आणि त्यांचा विनयभंग (Child Molestation) केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Akola Molestation Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अकोला (Akola Molestation Case) जिल्ह्यातील सरकारी शाळेतील एका 47 वर्षीय शिक्षकाला अटक (Teacher Arrested) करण्यात आली आहे. प्रमोद मनोहर सरदार असे या शिक्षकाचे नाव आहे. शाळकरी विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याचा आणि त्यांचा विनयभंग (Child Molestation) केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आतापर्यंत सहा मुली या शिक्षकाच्या गैरवर्तनाच्या बळी ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई केली, भारतीय न्याय संहिता (Bhartiya Nyaya Sanhita) च्या कलम 74 आणि 75 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितांचे जबाब नोंदवले

अकोलाचे पोलिस अधीक्षक (एसपी) बच्चन सिंग यांनी सांगितले की, पीडित मुलींचे जबाब नोंदवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पीडित मुलींनी टोल फ्री क्रमांकाद्वारे बालकल्याण समितीशी संपर्क साधल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर समितीच्या सदस्यांनी मंगळवारी सकाळी शाळेला भेट देऊन मुलींशी संवाद साधला. त्यानंतर भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (हेही वाचा, Nashik Sexual Assault Case: नाशिकमध्ये साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला अटक)

शिक्षक दाखवायचा अश्लिल व्हिडिओ

अकोल्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार याने विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांची छेड काढल्याचा आरोप आहे. उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमधून चार महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (हेही वाचा- Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड; शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण)

बदलापूर शालेय लैंगिक अत्याचार प्रकरण:

मुंबईजवळील बदलापूर येथील बालवाडीतील दोन मुलींचे कथित लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच पुढे आली. या घटनेनंतर संतप्त पालकांनी जोरदार निदर्शने केली. बदलापूर रेल्वे स्थानकावर संतप्त पालक आणि स्थानिक रहिवाशांनी गाड्या अडवल्याने कालचा दिवस (20 ऑगस्ट) जोरदार चर्चेत राहिला. ज्याचा परीणाम रेल्वे सेववर झाला. ज्यामुळे 10 एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने आणि आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली.  (Pune, Minor Sexual Assault: पुण्यातील भवानी पेठेतील शाळेत 11 वर्षीय मुलीचा विनयभंग; दहावीमध्ये शिकणाऱ्या आरोपी मुलाला अटक)

बदलापूर घटनेवरुन प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, प्रकरणाचा छडा लावला जाईल. हे प्रकरण हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून बदलापूर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकरणाची उस्चस्तरीय चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now