अजित पवार यांनाही माहिती नव्हते पारनेर चे 'ते' नगरसेवक शिवसेना पक्षाचे आहेत
शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले पारनेर (Parner) येथील नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत हे आपल्याला माहिती नव्हते. मात्र, जेव्हा माहिती झाले तेव्हा घडला प्रकार मला स्वत:ला फारसा आवडला नाही. त्यामुळे आपण या नगरसेवकांना परत पाठवण्यास सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
शिवसेना (Shiv Sena) नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश आणि पुन्हा घरवापसी, ही घटना राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत झालेल्या घोळावर खुलासा केला. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले पारनेर (Parner) येथील नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत हे आपल्याला माहिती नव्हते. मात्र, जेव्हा माहिती झाले तेव्हा घडला प्रकार मला स्वत:ला फारसा आवडला नाही. त्यामुळे आपण या नगरसेवकांना परत पाठवण्यास सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सारथी संस्थेसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. पारनेर येथील नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि शिवसेना घरवापसी याबाबत प्रसारमाध्यमांनी विचाले. या वेळी अजित पवार यांनी सगळा घटनाक्रमच सांगून टाकला. ते म्हणाले, 'त्या दिवशी मी बारामती येथे होतो. तेव्हा आमचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि काही लोक वाहनांतून बारामतीला आले. कोणताही प्रतिनिधी आला तर आम्ही त्यांना प्राधान्य देतो. कारण त्यांना पुढच्या कामाला जायचे असते. त्यामुळे मी त्यांना विचारले का आलात? ते म्हणाले पारनेरचे काही अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादीत यायचे म्हणत आहेत. का म्हणून विचारले असता, ते म्हणाले की आमचे पहिले प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तुम्ही प्रवेश देणार नसाल तर आम्ही भाजपमध्ये जाणार आहोत. मग मीही लगेच त्यांच्या गळ्यात गमछा टाकून प्रवेश दिला. पण, नंतर मला कळले की ते नगरसेवक अपक्ष नाहीत तर शिवसेना पक्षाचे आहेत. मित्रपक्षाच्या नगरसेवकांना असा प्रवेश देणे मलाही पटले नाही. त्यामुळे मग त्यांना परत शिवसेनेत पाठवले', असे अजित पवार म्हणाले. (हेही वाचा, पारनेर: बाण भात्यात परतले; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेल्या 'त्या' 5 नगरसेवकांची पुन्हा शिवसेना वापसी)
पुढे बोलताना अजित पवार म्हमाले की, या आधीही अम्ही राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून सत्तेत होतो. तेव्हाही आम्ही असे प्रवेश देत नव्हतो. घडला प्रकार पूर्ण माहिती नसल्याने घडला. त्यामुळे त्यात दुरुस्ती करण्या आली. यापुढे सर्वच मित्रपक्ष अशा गोष्टींवर संगनमताने निर्णय घेतील. मात्र, यातून उगाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले. महाविकासआघाडी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. असा कुणीही अर्थ काढू नये. मुख्यमंत्र्यांची आणि आमची या विषयावर चर्चाही नाही. कधी कधी येवढ्या मोठ्या महाराष्ट्रात काही घटना घडतात. त्याचा राज्यावर किंवा राज्याच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होतो असे नाही, असेही अजित पवार या वेळी म्हणाले.