Ajit Pawar Janta Darbar in Beed: 'चारित्र्य स्वच्छ ठेवा', धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचा बीड येथे जनता दरबार

अजित पवार यांनी बीड येथे जनता दरबार घेतला आहे. त्यानंतर ते पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रथमच धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षिरसारगर आणि खासदार बजरंग सोनावने उपस्थित राहणार आहेत.

Ajit Pawar | (Photo Credit- X)

Beed News: जनतेची कामे करताना, सरकारी योजनांचा लाभ घेताना, विकास कामे करताना काळजी घ्या. चारित्र्य स्वच्छ ठेवा. लोकांमध्ये वावरत असताना आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांची पार्श्वभूमी तपासा. चुकीची माणसं आपल्या आजूबाजूला फिरकू देऊ नका. दुटप्पी वागाल तर क्षमा नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेला दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यामुळे चर्चेच आलेले वाल्मिक कराड आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी धसास लावलेल्या या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची झाकोळलेली प्रतिमा या सर्वांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (30 जानेवारी) जनता दरबार घेतला. या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या बाजूला धनंजय मुंडे आणि कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

..तर मकोका लावला जाईल

उगाच कोणास खंडणी मागण्याचा प्रयत्न करण्याच प्रयत्न करु नका. कमरेला लावलेली पिस्तूले नाचवू नका नाहीतर एका फटक्यात मकोका लावला जाईल आणि पिस्तुलाचा परवाणाही रद्द केला जाईल, असा रोखठोक इशारा अजित पवार यांनी बीडकरांना दिला. याच वेळी त्यांनी आम्ही काम करायला आलो आहे. पंतंग उडवायला किंवा विटीदांडू खेळायला आलो नाही, असे सांगतानाच जे जे शक्य ते ते सर्व मी करेन. सरकारी योजनांचा लाभ घेताना काळजी घ्या. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, असा सज्जड दमच अजित पवार यांनी उपस्थितांना दिला. जनतेची कामे होणे महत्त्वाचे. विटी दांडू खेळायला नव्हे तर काम करायला आलो आहे, असेही ते या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Suresh Dhas On Resignation Of Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अद्याप चर्चा नाही - सुरेश धस यांची माहिती)

डीपीडीसी बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष

दरम्यान, अजित पवार बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीस अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण आक्रमकपणे लावून धरणारे आणि थेट नाव घेऊन बोलणारे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे प्रथमच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमावर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. खास करुन अपहरण, खंडणी, गुन्हेगारी आणि त्यासोबतच आर्थिक भ्रष्टाचार, सरकारी योजनांमध्ये घडलेल्या चुकीच्या बाबी यांमुळे हा जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now