ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आले नाही ते राम मंदिर उभारायला निघाले; अजित अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान, उद्धव यांच्या या घोषनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य आयोध्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपहासात्मक टीका केली आहे. गेल्या पाच वर्षात ज्यांना आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही ते अयोध्येत जाऊन राम मंदिर काय बांधणार, असा टोला लगावत पवार यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. समर्थ सहकारी साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ कार्यक्रमात ते जालना येथे बोलत होते.
दरम्यान, औरंगाबाद, बीड आणि लातूर येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांचे मेळावे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (२३ ऑक्टोंबर) पार पडले. या मेळाव्यांमध्येही उद्धव यांनी 'राम मंदिर उभारणीचे काय झाले' असा सवाल विचारण्यासाठी आपण अ योध्येला निघालो आहोत, असेा पुनरुच्चार केला. शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या शिवसेनेसाठीच्या ऐतिहासिक मेळाव्यात उद्धव यांनी आयोध्या दौऱ्याची घोषणा सर्वप्रथम केली होती. (हेही वाचा, जमत नसेल तर, तसं सांगा! राम मंदिर आम्ही उभारु; उद्धव ठाकरेंचा घणाघात, अयोध्या दौऱ्याचीही केली घोषणा)
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात येत्या २५ आक्टोंबरला आपण आयोध्या दौऱ्यासाठी निघणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, उद्धव यांच्या या घोषनेनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विरोधकांनी उद्धव ठाकरे आणि पर्यायायने शिवसेनेवर टीका केली आहे. काही हिंदुत्त्वावादी विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि संघटनांनी या भूमिकेचे कौतुक केले आहे. तर, काहींच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.