Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांचे गुवाहाटीला एअरलिफ्ट
स्पाइसजेटची ही विमाने आली आहेत. या तिन्ही चार्टर्ड विमानांमध्ये बसून या आमदारांना नेण्याची तयारी सुरू आहे. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्याच्या राजकीय गदारोळात एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरतच्या ले मेरिडियन हॉटेलमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात बंडखोर नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आमदार मुक्कामी आहेत, त्यांना विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे नेले जात आहे. त्यांना येथून मध्यरात्री एअरलिफ्टने (Airlift From Surat To Guwahati) नेले जाईल. साडेबारा नंतर ते घेतले जातील. या आमदारांना येथून नेण्यासाठी तीन चार्टर्ड विमाने पोहोचली आहेत. स्पाइसजेटची ही विमाने आली आहेत. या तिन्ही चार्टर्ड विमानांमध्ये बसून या आमदारांना नेण्याची तयारी सुरू आहे. बंडखोर आमदारांची पळवापळवी होऊ नये यासाठी त्यांना हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आमदारांचे नातेवाईकही त्यांना भेटायला येऊ शकतात. यासाठी सर्व बंडखोर आमदारांना हलवण्यात येणार आहे. सुरत एअरपोर्टवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा करून अनेक अटी त्यांच्यासमोर ठेवल्या. शिंदे म्हणाले आपण पुन्हा भाजपासोबत युती करु. मी कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचीही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. (हे देखील वाचा: Maharashtra Political Crisis: 'महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा'; मंत्री Ramdas Athawale यांची मागणी)
नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे गुजरातच्या सूरत शहरात शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. शिंदे सूरतमधील ली-मेरिडीअन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पंधरा मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.