Ahmednagar Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कोपरगावात आणखी एका कारचा अपघात, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू
कोपरगाव परिसरात एका कारचा अपघात झाला असल्याची घटना समोर आली. कार चालकाचा नियंत्रण हातातून सुटताच डिव्हाडरला कार आदळली आणि अपघात घडून आला.
Ahmednagar Samruddhi Mahamarg Accident : बुलढाण्यात काल एका खासगी बसचा समुध्दी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघात झाला आणि या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला ही बातमी ताजी असताना देखील आज सकाळी समुध्दी महामार्गावर एका कारचा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अहमदनगरमधील कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील धोत्रे गावाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
कारचा अपघात कसा झाला ?
भरधाव वेगाने येणाऱ्या ह्या कारने डिव्हायडरला आधळला आणि ती कार अक्षरश: चक्काचूर झाली. दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा सुत्राकडून माहिती मिळाली आहे.
नांडेडहून मुंबईकडे ही कार निघाली होती. दरम्यान सकाळी ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. नगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा बस अपघाताने सपुर्ण महाराष्ट्र हादरला असताना पुन्हा समृध्दी महामार्गावर दुर्देवी अपघात झाला आहे. बुलढाणा बस अपघात बसचा लोखंडी पोलला आदळली आणि बस उलटी पडली. क्षणार्धात बसला आग लागली आणि 25 लोकांचा होरपळून मृत्यू झाला.
(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 02:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

