अहमदनगर: तमाशा मधील महिला कलाकारांना गावातील टोळीकडून मारहाण, 12 जण जखमी

त्यावेळी गावातील एका टोळक्याने तमाशाच्या तंबुत घुसुन महिला कलाकारांना मारहाण केली.

Representative Image (Photo credits: File Photo)

अहमदनगर (Ahmednagar) येथे तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गावातील एका टोळक्याने तमाशाच्या तंबुत घुसुन महिला कलाकारांना मारहाण केली. तसेच त्यांच्यासोबत काही जणींसोबत विनयभंग करण्याचा सुद्धा प्रयत्न केला.

टाकळी-लोणार येथे गुरुवारी यात्रेनिमित्त हिरामण-बडे शिवकन्या यांच्या तमाशा मंडळाच्या फडाचे आयोजन केले होते. त्यावेळी 20-25 जणांनी घुसुन कलाकारांना मारहाण केली. यामध्ये पुरुष मंडळींनासुद्धा मारहाण करण्यात आल्याचे वृत्त सामना ऑनलाईने दिले आहे.

(दहिसर येथे रिक्षाची धडक लागून महिलेचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)

या प्रकरणा नंतर टोळक्यांनी पळ काढला आहे. तर पोलिसांकडून टवाळखोरांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.