महाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा पुढील दोन तीन दिवसांत निर्णय होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच कुणाला कोणते मंत्रालय मिळणार, याचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Maharashtra CM Uddhav Thackeray | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर अखेर राज्यात शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादीचे (ShivSena-Congress-Nationalist Congress Party) सरकार स्थापन केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच कुणाला कोणते मंत्रालय मिळणार, याचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच महाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा निर्णय पुढील दोन-तीन दिवसांत करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्रीपदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकासआघाडीच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. परंतु, मंत्रिमंडळाच्या विस्तरासोबतच कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या आम्ही सातही लोक एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अजूनही खातेवाटप झाले नाही मग काय? असे काहीही नाही. आम्ही सध्या सर्व खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. खातेवाटपाचा निर्णय आम्ही पुढील दोन तीन दिवसांत घेऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाशिवआघाडी मध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि 'हे' असतील महाराष्ट्राचे संभाव्य मंत्री

ट्वीट-

तसेच, महाविकासआघाडीने कामगाजाला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत एक दोन बैठकी घेऊन संपूर्ण माहिती मिळवणे अशक्य आहे. त्यासाठी आणखी काही बैठका घेतल्या जाणार आहे, त्यानंतरच आम्ही ठरवल्याप्रमाणे सर्व निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif