महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: राज ठाकरे यांची पुणे येथील पहिली सभा पावसामुळे रद्द

मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलं असल्याने मनसे पदाधिकार्‍यांनी सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

MNS | (Photo Credits: commons.wikimedia)

Pune Rains: पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. आज (9 ऑक्टोबर) दिवशी पुण्यातील राज ठाकरेंची (Raj Thackeray)  सभा पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. पुण्यात आज वादळी वारा आणि पाऊस असल्याने सरस्वती मैदान (Saraswati Maidan) येथील  सभा रद्द करण्यात आली आहे. मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलं असल्याने मनसे पदाधिकार्‍यांनी सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या प्रचाराचा नारळ आज पुण्यात फूटणार होता. मात्र आज पावसामुळे ती रद्द करण्यात आली आहे. पुणे: विधानसभा निवडणूक प्रचारात मनसेची कोंडी; राज ठाकरे यांच्या सभेसाठी मिळेनात मैदाने

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे ईडी चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर या सार्‍या प्रकारावर पहिल्या6दाच राज ठाकरे बोलणार होते. त्यामुळे सामान्यांसह अनेकांचं राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेकडे लक्ष लागले होते. मात्र आजची सभा रद्द झाली आहे.  पुण्यात राज ठाकरे यांच्या अजून 2 सभा आयोजित केलेल्या आहेत.  Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेसाठी मनसेची 32 जणांची तिसरी यादी जाहीर; पक्षाकडून आतापर्यंत 104 उमेदवार रिंगणात

MNS Tweet

 

नक्की वाचा: Pune Rains: पुण्यात तुफान पाऊस, अनेक भागांत साचले पाणी; Watch Videos

मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी स्टेज, माईक, स्पीकर्स यांची यंत्रणा सज्ज ठेवली होती. मात्र निसर्गासमोर सारेच हतबल आहेत. सध्या प्रचारासाठी मैदानं मिळत नसल्याने मनसेची कोंडी झाली होती त्यामध्ये आता पावसचा व्यत्यय आल्याने अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राज ठाकरे काल दसर्‍याचा मुहूर्त साधतच कोथरूडमध्ये दाखल झाले होते.