महाराष्ट्र सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर नितीन गडकरी यांचा मोठा खुलासा; महायुतीचा मुख्यमंत्री होणार,RSS चा काही संबंध नाही

मात्र खुद्द गडकरी यांनी आज या वृत्ताचे खंडन केले आहे. राज्यात सत्तेचा तिढा सुटेल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आगामी मुख्यमंत्री असतील असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Nitin Gadkari | Photo Credits: Twitter / ANI

Maharashtra Government Formation:  महाराष्ट्रात सध्या अस्तित्त्वात असलेल्या सरकारचा कार्यकाळ पुढील 24 तासांमध्ये संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस निर्णायक आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. अशामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) राज्यात परतणार असल्याची चर्चा होती. मात्र खुद्द गडकरी यांनी आज या वृत्ताचे खंडन केले आहे. राज्यात सत्तेचा तिढा सुटेल. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आगामी मुख्यमंत्री असतील असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भाजप आज 'सत्ता स्थापने'चा दावा करणार नाही; सुधीर मुनगंटीवार 'महायुती'चं सरकार स्थापन करण्यावर ठाम

दिल्ली एअरपोर्टवर पत्रकारांशी बोलताना आज महराष्ट्राच्या राजकारणात परणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन करावं. सोबतच या सत्ता संघर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत यांचा संबंध नाही आणि तो जोडणंदेखील योग्य नसल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मतदारांचा कौल महायुतीच्या बाजूने आहे. परंतू शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार, सत्तेमध्ये समसमान वाटपासाठी शिवसेना ठाम आहे. त्यामुळे हा तिढा वेळेत न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.