आदित्य ठाकरे याच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून जळगाव मधून सुरूवात; महाराष्ट्रभर सामान्यांना भेटणार
या यात्रेमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा जळगाव येथून सुरू होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य महाराष्ट्रभर फिरणार आहे.
महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्याच पक्षांनी कंबर कसायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेकडूनही आज (18 जुलै) पासून जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात होणार आहे. या यात्रेमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा जळगाव येथून सुरू होणार आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य महाराष्ट्रभर फिरणार आहे. सामान्य नागरिकांना भेटणार आहे. लोकसभेसाठी ज्यांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे त्यांचे आभार मानणार आहे तर जर ज्यांनी मत नाही दिली त्यांची मनं जिंकायला ही यात्रा असेल असेल शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. नुकत्याच शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरून 'मी येतोय ...' अशा मेसेजसह खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपा युतीने महाराष्ट्रात जागा जिंकल्या. आता हा विजयरथ विधानसभा निवडणूकी दरम्यानही तसाच कायम ठेवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. प्रामुख़्यने तरूण आणि नव मतदारांना जिंकण्यासाठी लोकसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी 'आदित्य संवाद' हा उपक्रम राबवला होता. आता महाराष्ट्रभर पुन्हा आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चाचपणी करण्यासाठी आदित्य मैदानात उतरला आहे.आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री असावेत ही पक्षासह जनभावना: संजय राऊत
काही दिवसांपासून आदित्य यंदा निवडणूकीच्या मैदानातही उतरणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईतील काही मतदार संघात त्याची चाचपणी सुरू आहे. मात्र अद्याप या बाबत शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा आदित्य कडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र काही शिवसेना नेत्यांना आदित्यने निवडणूक लढावी अशी इच्छा आहे. जर आदित्य निवडणूकीच्या मैदानात उतरला तर ठाकरे घराण्यातील तो निवडणूक लढणारा पहिलाच सदस्य असेल.