पंढरपूर: आषाढी एकादशी 2019 च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल- रुक्मिणीच्या मंदिरामध्ये बदल; मुखदर्शन होणार सुकर
मात्र आता सिंहगड इंस्टिस्ट्युटच्या विद्यार्थ्यांनी खास लाकडी प्लॅटफॉर्म डिझाईन करून उभारण्यात आले आहेत. यामुळे या वर उभं राहून विठ्ठलाचे मुखदर्शन घेणं सुकर होणार आहे
यंदा 12 जुलै 2019 दिवशी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशी हा वाराकर्यांसाठी मोठा सण आहे. देशा-परदेशातील वारकरी मंडळी आणि विठू माऊलीचे भक्त पंढरपूर येथील विठ्ठल आणि रखुमाईच्या मंदिरात येऊन दर्शन घेण्यासाठी गर्दी होते. मात्र यंदापासून विठू माऊलीचं मुखदर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांना मुखदर्शन सुकर होण्यासाठी खास लाकडी पायर्यांची सोय करण्यात आली आहे.
पूर्वी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला आषाढी दिवशी दर्शन घेण्यासाठी सुमारे 20 तास लागत होते. मात्र आता सिंहगड इंस्टिस्ट्युटच्या विद्यार्थ्यांनी खास लाकडी प्लॅटफॉर्म डिझाईन करून उभारण्यात आले आहेत. यामुळे या वर उभं राहून विठ्ठलाचे मुखदर्शन घेणं सुकर होणार आहे. ही सोय आषाढी एकादशीच्या तीन दिवस आधीपासून मंदिरात सुरू केली जाणार आहे. सध्या भाविकांसाठी विठ्ठलाचे मंदीर 24 तास दर्शन खुले ठेवले आहे. Shri Vitthal Rukmini Darshan 2019: आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी 24 तास दर्शन सुरु राहणार
विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची पूजा करतात. त्यानंतर भाविकांना दर्शन खुले केले जाते. मंत्र्यांसोबत दर्शनाच्या रांगेतील एका जोडप्याला विठूरायाच्या पूजेचा मान दिला जातो.