Government Offices Attendance: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घेतलेल्या 'या' निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने आज राज्यभर निषेध आंदोलन

राज्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Government Offices (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण भारतात कोरोनाचे (Coronavirus) संकट गडद होताना दिसत आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Governmemt) 31 ऑगस्टला आदेश काढून शासकीय कार्यालयात (Governmemt Offices) अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली होती. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात आज महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने राज्यभर निषेध आंदोलन पुकारण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसून परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता 50 टक्क्यांपर्यंत उपस्थिती ठेवावी, अशी महासंघाची मागणी आहे.

कोरोनाची लागण होऊन मंत्रालयात आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संसर्गाचे लोण मंत्री कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत उपस्थिती हळूहळू वाढवावी. 100 टक्यांऐवजी सध्या 50 टक्के उपस्थिती करावी, अशी महासंघाची भूमिका आहे. परंतु राज्य सरकार त्यावर विचार करायला तयार नाही, त्यामुळे संघर्षांशिवाय आता पर्याय राहिलेला नाही, असे महासंघाचे नेते ग. दि. कु लथे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Cases in Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्येने 12 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यांपैकी 32 हजार 671 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 8 लाख 84 हजार 341 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात 2 लाख 91 हजार 238 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. परंतु, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.