बीड: पतीची आत्महत्या; अंत्यविधी होताच पत्नीनेही गळफास लावून संपवले स्वत:चे जीवन
पतीच्या आत्महत्या केल्यानंतर पत्नीनीही गळफास लावून आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना घटना बीड (Beed) जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे घडली आहे.
पतीच्या आत्महत्या केल्यानंतर पत्नीनीही गळफास लावून आत्महत्या (Sucide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना घटना बीड (Beed) जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यातील चकलंबा येथे घडली आहे. पतीने केलेल्या अत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, पतीने केलेल्या आत्महत्येचा पत्नीला मोठा धक्का लागला होता. यामुळे पतीची अंतविधी होताच पत्नीने गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले आहे. पत्नीने पतीच्या विरहाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या करणाऱ्या जोडप्याचे गेल्या 1 वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या जोडप्यांनी आत्महत्या केल्याने मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून मृताच्या कुटुंब आणि मित्र परिवारांकडेही विचारपूस करत आहेत.
रणजित जाधव ( 22 वर्षे) आणि मिनाक्षी जाधव ( 20 वर्षे) यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता. रणजित जाधव हा औरंगाबाद येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. विवाहानंतर रणजीत पत्नी मिनाक्षीसोबत औरंगाबाद येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. बुधवारी रणजित जाधव याने औरंगाबाद याठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदन करुन रणजित जाधव याचे पार्थिव रात्री उशिरा चकलांबा या गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक दु:खात असतानाच गुरूवारी 12 मार्चला सकाळी 8 वाजता घरालगत असलेल्या शौचालयातील आडूला दोरी बांधून मिनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- सातारा: अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका विवाहित महिलेच्याविरोधात गुन्हा दाखल
नुकतीच सातारा येथे आपल्या पत्नीचा आपघाती मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पतीने गळफास लावून आत्महत्या केली होती. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पती-पत्नी दुचाकीवरून वडगावला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघाता पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. या जोडप्यांचेही 1 वर्षापूर्वी लग्न झाले होते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2020 01:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

