Chandrakant Patil On Pankaja Munde: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे कौतूक केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया
या संदर्भात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवार यांचे जाहीर कौतुक केले आहे.
कोरोनाच्या संकट काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून सातत्याने भेटीगाठी आणि दौरे सुरूच आहेत. या संदर्भात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवार यांचे जाहीर कौतुक केले आहे. यामुळे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर पंकजा मुंडे यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे. यासंबंधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) विचारण्यात आले असता त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. चांगल्याला चांगले म्हणणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ती उचलली आहे. पण महाविकास आघाडीने उचलली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सगळे त्यांनी रद्द केले आहे, चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार या वयात किती प्रवास करतात. तसेच त्यांच्या शेती आणि सहकार विषयातले ज्ञान यासंबंधी मी नेहमी सांगत असतो. आम्ही मंत्री असताना सामान्यांसाठी फोन करुन ते चर्चा करायचे. चांगल्याला चांगले म्हणणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आम्ही ची उचलली आहे. पण महाविकास आघाडीने उचलली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सगळे रद्द केले, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे देखील वाचा-Girish Mahajan: जळगाव येथे एका कार्यकर्त्याकडून भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल
“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा अशायाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.